जिल्हास्तरीय पक्षपदाधिकारी असूनही स्वतःची निष्क्रीयता लपविण्यासाठी स्मशानासाठी याचना करण्याची सुजित जाधव यांच्यावर आली वेळ

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक संतोष जाधव यांची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : एका पक्षाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी असलेल्या सुजीत जाधव यांची स्मशानभूमी संदर्भातील बातमी वाचून , त्यांच्या नाकर्तेपणाची कीव आली. निवडणूक आली की झोपेतून जागे व्हायचे आणि समजाच्या नावाने गळे काढायचे ही त्यांची जूनी सवय समाज ओळखून आहे, अशी टीका भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे कणकवली विधानसभा संयोजक संतोष जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
सुजीत जाधव गेली दहा वर्षे एका पक्षाचे उपाध्यक्ष आहेत .शिवाय ते एका सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ही आहेत . जिल्हाध्यक्ष होण्यासाठी जी शक्ती ते पणाला लावतात व जे समाज बांधव त्यांना समर्थन देतात , निदान त्या बांधवांसाठी तरी मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी केला असता व त्यांना जरी शासकीय सुविधांचा , योजनांचा फायदा करून दिला असता , तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
म्हणे विधान सभा निवडणूकीत हिसका दाखवणार
त्यांनी विचार करून जर लिहीले असते तर त्यांचे कौतुकच झाले असते . कारण गेली दहा वर्षे ते ज्या पक्षात पदाधिकारी आहेत त्याच पक्षाचे खासदार दहा वर्षे होते. शिवाय आमदारही त्याच पक्षाचे होते. समाजाचे नेते म्हणून समाजाला सोबत घेऊन समाजाची कामे घेऊन ते किती वेळा आमदार , खासदारांकडे जाऊन बसले ? किती कामांचा पाठपुरावा केला ? व कोण – कोणत्या गावात स्मशान शेड , पायवाटा , स्मशानशेड रस्ता , नवीन घरे , घरदुस्ती प्रस्ताव ,अशी कामे आमदार ,खासदारांकडून मंजुर करून आणली ते जाहीर करावे . उगाच पाठ थोपटून घेण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये . आता समाज जागृत आहे , संयमी व विचारी आहे. प्रत्येक शब्द , वाक्य यावर विचार करतो . प्रत्येकाचे मूल्यमापनही करतो . त्यामुळे भुलथापा देऊन उपयोग होणार नाही . तुमचा जिल्हा फक्त कणकवली मतदार संघापुरताच मर्यादीत दिसतो . पण कुडाळ , मालवण मतदार संघात तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष म्हणून किती स्मशान शेड झाल्या ते जाहिर करा. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून ही खोड सोडा. होय , आम्ही भाजप पक्षाचे काम करतो , आम्ही राणे साहेबांचे शिलेदार आहोत , याचा आम्हाला अभिमान आहे .
आम्ही आमच्या आमदारांकडून दिगवळे रांजणवाडी येथे आमच्या समाजासाठी शेड मंजुर करून आणली . हे श्रेय मा. नितेश राणे साहेबांचेच आहे . त्यांना एक जाहीर सल्ला देतो , समाजात दूही माजवून पक्षाची पोळी भाजणे इष्ट नाही . राजकारणाच्या जागेवर राजकारण करू या . पण पक्षा – पक्षांतील मतभेद समाजात नको .
घोडा मैदान जवळच आहे .
लोक सभेत खासदार नारायणराव राणे मताधिक्याने विजयी झाले आहेतच . आता २३ नोव्हेंबरला नितेश राणे विजयाची हॅट्रीक करतीलच शिवाय भरघोस मताधिक्क्याने विजयी होतील . ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे . तेव्हा उगाच काळजी करु नका .नसते उद्योग बंद करा . आपले समाज बांधव कोणत्या ना कोणत्या पक्षात सक्रीय आहेत . ते त्या – त्या पक्षात निष्ठेने काम करत आहेत , त्यांचा वापर समाज उन्नती साठी करूया , येवढाच प्रेमाचा व सबुरीचा सल्ला देतो, असे जाधव यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!