जिल्हा बँकेच्या या निर्णयाने होणार दिवाळी गोड
आचरा (प्रतिनिधी) : दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन मिळाले नाहीतर निवृत्ती वेतना एवढा बिनव्याजी अॅडव्हान्स देण्यात यावा असे विनंती पत्र व समक्ष चर्चा सेवा निवृत्त ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राणे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू सचिव प्रकाश राणे यांनी सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे मुख्याधिकारी गावडे यांच्याशी केली. शासनाने दि.25/10/24 पूर्वी निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.परंतु अशा निर्णयाची अंमलबजावणी मुदतीत न झाल्याचा आपल्याला अनुभव आहे असे यावेळी मत संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.
जिल्हाबँक अध्यक्ष चेअरमन मनीष दळवी कार्यालयात उपस्थित नसल्याने याबाबत त्यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्या नंतर मनीष दळवी यांनी सदर प्रस्तावास आपण मान्यता देत असल्याचे संघनेस कळविले व ज्यांची निवृत्तीवेतनाची बँक खाती सिंधुदुर्ग बॅंकेत आहेत त्यांना दि.28/10/24 पासून निवृत्तीवेतन अॅडव्हान्स मिळणार असल्याचेही सांगितले.