नितेशपर्व 3. 0 ! विराट रॅलीच्या सुरुवातीने नितेश राणेंचे शक्तिप्रदर्शन

खा. नारायण राणे, नीलम राणेंसह अख्खे राणे कुटुंब रॅलीत सहभागी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेचे भाजपा महायुती चे उमेदवार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विराट रॅलीला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणेंसह , गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, शिवसेना उपनेते संजय आग्रे, दत्ता सामंत,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, काककवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, अरविंद रावराणे, सिद्धेश दिलीप रावराणे, नामदेव जाधव, संजना सावंत आदी प्रमुख कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत.हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीत गांगो मंदिर पासून तहसीलदार कार्यालया पर्यंत ही रॅली निघाली असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभाही होणार आहे.

error: Content is protected !!