वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे गावच ग्रामदैवत श्री रासाईदेवीचा जत्रोत्सव सोमवार दि. १३ जानेवारी होत आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रासाई देवीची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होते. याहीवर्षी सोमवारी १३ जाने.ला देवीचा जत्रोत्सव होत आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमासहीत रक्तदान शिबीर, जिल्हा स्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, खेळ पैठणी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या सकाळी ९.३० वा. देवीची विधीवत महापूजा व महाआरती होणार आहे. त्याचवेळी मंदीराशेजारील मंडपात सकाळी ९.३० ते दु १२ वा. पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ करण्यात येणार आहे. पुजा विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी १.३० वा देवींची ओटी भरणे, नवस बोलणे फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते सायकांळी ६ वाजेपर्यंत महीलांसाठी “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या खेळातील विजेत्या व उपविजेत्या महीलांना पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच अंतिम १० स्पर्धकांना आकर्षण साडी भेट देण्यात येणार आहे.
सायंकाळच्या सत्रात ६ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. यानंतर रात्री ११ वा देवीची पालखी मिरवणूक, रात्रौ १२ वा. दशावतार नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आचिर्णे व सरपंच ग्रा पं. आचिर्णे यांनी केले आहे.