खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात विविध कारणांनी निराधार व बेघर जीवन जगत असलेल्या बांधवांना संवेदनशील नागरिक, पोलीस अधिकारी व कार्यकर्ते दाखल करीत असतात.नुकतेच दि.१३जानेवारी २०२५ रोजी कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी (पोलीस नाईक -११७६) व्हि.व्ही. सावंत यांच्या पत्रानुसार टि रामानी नावाच्या दक्षिण भारतीय भाषा बोलणा-या महिलेला आधार आणि सुरक्षिततेसाठी पणदूर येथील सविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे.
कणकवली येथील यारा फौंडेशन संस्थेचे विश्वराज विकास सावंत रा.तरंदळे तालुका कणकवली यांना सकाळी १०.३० चे सुमारास सदर महिला मु.पो. तरंदळे, ता.कणकवली येथे फिरत असताना मिळून आली.सदर महिलेला तिचे नाव विचारले असता तीने टिरमन्नी असे सांगीतले.व पूर्ण नाव व पत्ता माहित नसल्याचे सांगीतले.त्यावरून विश्वराज यांनी सदर महिलेला कणकवली पोलीस स्टेशन येथे आणले. सदर महिलेचे नातलग मिळून येईपर्यंत महिलेला आश्रमात दाखल करण्याच्या पोलीस अधिकारी व्हि.व्ही.सावंत यांच्या विनंती पत्रावरून महिलेला संविता आश्रमात दाखल करण्यात आले आहे. यावेळी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप परब,महिला पोलीस अधिकारी तसेच संविता आश्रमच्या विजया कांबळी, परिचारिका प्रतिक्षा चव्हाण हे उपस्थीत होते.














