नितीन पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळच्या जिल्हा युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या युवक उपाध्यक्षपदी कणकवली – कलमठ येथील नितीन गणपत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनी संयुक्तरित्या नितीन पवार यांची नियुक्ती जाहीर केली.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यकारिणीच्या वेळी संघटनेने ही निवड जाहीर करून श्री.नितीन पवार यांना नियुक्तीपत्र दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,भवन समिती सहप्रमुख राजन वालावलकर,जिल्हा सदस्य आनंद जाधव,शिक्षण समिती प्रमुख प्रशांत चव्हाण,कणकवली कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण,महेंद्र देवरुखकर, मनोहर पाताडे,संतोष जाधव,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. श्री.पवार यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्रमंडळी तसेच समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!