कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली चव्हाणवाडी येथे श्री संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने सकल हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्रीमंत राजे शिव छत्रपती यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण तसेच वाडीतील शिवप्रेमीनी शिवरायांना अभिवादन केले.मंडळाचे सचिव कृष्णा लक्ष्मण चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
कळसुलीत संत रोहिदास महाराज उन्नती मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी












