कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान चिठ्ठीद्वारे कल्याण मटका स्वीकारताना आढळून आल्याबद्दल गजानन बाबाजी तिरोडकर ( वय ६५, रा .टेंबवाडी, कणकवली ) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष शिवगण यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता केली. आरोपी कडून रोख रु .२ हजार ७४० व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कल्याण मटका घेताना कणकवलीत एकावर गुन्हा दाखल












