असरोंडी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक सुशांत पाटील ,सर्व सहकारी शिक्षक व प्रदीप सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडला. यावेळी स्वप्नाली कोकरे इ.आठवी व दिवेश बाणे इ. नववी याने उत्कृष्ट मनोगते व्यक्त केली. यानंतर शिक्षक कमलेश गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. प शिक्षक भगिरथ चिंदरकर यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या प्रेरणादायी गीताचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक सुशांत पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या तेजस्वी जीवनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पोवाडा, पाळणा गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गौरव गीते सादर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी प शिक्षिका श्रीमती लीना राणे व ज्योती वसावे यांनी मेहनत घेतली. सुत्रसंचालन रश्मी सावंत यांनी केले व आभार मिलिंद गावकर यांनी मानले.

error: Content is protected !!