कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे सर्व्हिस रोडवरील हॉटेल विजया नजीक गोवा बनावटीची दारू विकताना
भरतेश रमेश शेट्टी (वय ३६, रा. कासार्डे ) याला एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २४ हजार ७५० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. एल सी बी पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार बस्त्याव डिसोजा, हवालदार आशिष जामदार यांनी ही कारवाई १८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजता केली. याबाबत हवालदार आशिष जामदार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भरतेश शेट्टी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार्डेत गोवा बनावटीची दारू पकडली ; एल सी बी ची कारवाई












