गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या स्तुत्य उपक्रम
तळेरे (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने किल्ले देवगड या किल्ल्यावरती दि.२३ मार्च रविवार या दिवशी स्वच्छता मोहीम फत्ते करण्यात आली. या मोहीमेची सुरवात महादरवाजा पासून करण्यात आली या मध्ये टेहाळणी बुरूज,तटबंदी, खंदाकातिल प्लास्टिक बाले किल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला. छत्रपतींचे गड किल्ले हे मनाला शक्ती उर्जा देणाऱ्या वास्तू आहे. याचे जतन,संवर्धन संरक्षण झाले पाहिजे. ज्या मुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल. व या इतिहासा मधून प्रेरणा भेटेल याच भावनेतून गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. या मोहीमेचे आयोजन अध्यक्ष – शूभम रानम,संपर्क प्रमुख-अभजित तिर्लोटकर, विकास तोरसकर, यांनी केले. या मोहिमेमध्ये यशपाल जैतापकर,रामदास घारकर, सूरज राणम,विक्रांत मोरये,चेतन गुरव, अनिरुद्ध तिर्लोटकर, प्रशांत गूरव,दुर्गेश गुरव,सौरभ मंणचेकर, रोहित गुरव,अभिषेक गुरव, किशोर ठुकरूल,सायली,पांचाळ,सानिका रानम, जान्हवी रानम,गौरी मणचेकर,पंकज गूरव ,अविनाश मोरे, आयूष मेस्त्री,सुरेंद्र मोरये,स्वराज मोरये,चीन्मय मोरये,प्रथमेश कोळसूमकर,असे 28 दुर्ग सेवक दुर्ग सेविका उपस्थितीत होते. या मोहीमेला यशवंत भोवर तसेच स्थानिक नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले.













