खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित आंबा कलम रोपाचे शेतकऱ्यांना वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने भाजप खारेपाटण विभागाच्या वतीने दि.२३ जून रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे केक कापून साजरा करण्यात आला. तर यावेळी येथील शेतकरी बांधवांना आंबा कलम रोपांचे वाटप सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांचे शुभहस्ते करण्यात आले.

याबरोबरच भाजप खारेपाटण विभगाच्या वतीने नामदार नितेश राणे यांना उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो याकरिता खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मंदिरात देवाला साकडे घालण्यात आले. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, भाजप महिला कार्यकर्त्या उज्ज्वला चिके, साधना धुमाळे, नडगिवे सरपंच माधवी मण्यार, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, खारेपाटण माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, मनाली होनाळे, दक्षता सुतार, भाजप कार्यकर्ते भाऊ राणे, देवानंद ईसवलकर, शेखर शिंदे, ऋषिकेश राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी अनिकेत गुरव, अजय तेली आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!