नशिब बलवत्तर म्हणून मायलेकी बचावल्या
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने एडगांव पाष्टेवाडी येथे राप्रमिला भिकाजी पाष्टे यांच्या घरानजिक असलेल्या चिंचेचा मोठा वृक्ष पडून प्रमिला पाष्टे यांचे शासनाच्या घरकुल योजनेतील घर जमिनदोस्त झाले. केवळ नशिब बलवत्तर म्हणून या घरात झोपलेल्या प्रमिला पाष्टे आणि त्यांची मुलगी अश्विनी पाष्टे बालबाल बचावल्या. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जाऊन त्यांना धीर दिला.











