चर्मकार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – राजेंद्र चव्हाण
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने अनुसूचित जाती जमातीतीतील नागरिकांसाठी विशेष जनता दरबार शनिवार दिनांक 26 जुलै, 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात. चर्मकार समाजाचे वर्षांनुवर्षं प्रलंबित असलेले अनेक सार्वजनिक तसेच वैयक्तिक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न मांडण्याचे आणि आपले म्हणणे थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोचविण्याची संधी या जनता दरबारात मिळणार आहे.
या जनता दरबार मध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासनाचे अन्य खातेप्रमुख उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आपल्या समाजाच्या समस्या लागलीच मार्गी लागतील. त्यामुळे या जनता दरबार मध्ये मोठ्या संख्येने चर्मकार संजबांधवांनी उपस्थित राहून आपल्या समस्या पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडाव्या असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी यांनी केले आहे.











