१ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
मालवण (प्रतिनिधी) : मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत गांजाचा साठा, दोन मोटारसायकल, सहा मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ३१ जुलै रोजी रात्री ८:१५ वाजता मालवण तालुक्यातील वराड, कुसरवे भागात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप विनायक परब (४१), अविरत गणेश ढवण (३१), हेमंत अनिल भोगले (२४), आणि आकाश शिवाजी निकम (२४) यांचा समावेश आहे. पोलिसांनी २६२ ग्रॅम गांजा (मूल्य ₹७,२००), दोन दुचाकी, सहा मोबाईल फोन्स आणि इतर साहित्य असा एकूण ₹१,१७,७०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोल्हे, पीएसआय हाडळ, जीपीएसआय शेळके व त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे मालवण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.












