विविध स्पर्धा परीक्षांत पीएमश्री श्री महालक्ष्मी कोकिसरे शाळेचे सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी) : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षांत तालुक्यातील पीएमश्री श्री महालक्ष्मी कोकिसरे या शाळेतील विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शाळेतील इंद्रनील अमोल येनगे इयत्ता दुसरी याने राज्यस्तरीय मंथन परीक्षा जिल्ह्यात तिसरा ,राज्यात आठवा तर BTS राज्यस्तरीय परीक्षेत तालुक्यात पहिला , STS व DCA परीक्षेत जिल्ह्यातील टॉप टेन मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, शार्दुल सुमित धोंडे याने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत तालुक्यात दुसरा, जिल्ह्यात नववा तर राज्यात चौदावा क्रमांक प्राप्त केला आहे. याच शाळेचा यशार्थ विनायक मेणये इयत्ता पहिली याने BTS परीक्षेत तालुक्यात तिसरा मिळवला आहे.

रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत शाळेच्या गौतमी चेतन बडमे, समृद्धी सदानंद वाडेकर, अहान अरीफ आरवाडे, श्रेया विजय धोंड, हिरा सिद्धांत गावडे, शार्दुल सुमित धोंडे, अद्वैत सुनील वाडेकर, श्रेयस नंदकिशोर प्रभू यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केली असून ख़ुशी गणेश पाटेकर, देवांगी राजेंद्र गराठे, राशी शैलेश गावडे यांनी राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक व ओवी मंगेश वळंजू ,कौस्तुभ अमोल वळंजू , माहिरा मुबारक शेख यांनी कांस्य पदक प्राप्त केली आहेत.

या सर्वांना मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, शिक्षक अमोल येनगे, गीता टक्के, आकांक्षा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
‘मुलांतील माणूस घडविणारी शाळा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या तालुक्यातील पीएमश्री श्री महालक्ष्मी कोकिसरे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अशोक वडर, विस्तार अधिकारी रुचिता कदम, केंद्रप्रमुख नितीन कदम, ग्रामपंचायत कोकिसरे, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!