“स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उ‌द्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्यभर होणार असून राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर सभागृह नरिमन पॉईंट येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

या अभियानाची उ‌द्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः –
या अभियानाचा मुख्य उ‌द्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे असा आहे. या मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज (AAM-SHC) तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये (CHCs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (AAM-PHC/UPHC) येथे विशेषज्ञाव्दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहे. खाजगी महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नीत रुग्णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दि. १७ सप्टेंबर २०२५ व 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 09.00 ते 3.00 यावेळात या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग). मोफत नेत्र तपासणी. दंत तपासणी शिबिरे. माता आणि बाल आरोग्य तपासणी (प्रसूतीपूर्व तपासणी, लंसीकरण). क्षयरोग जागरूकता आणि तपासणी. अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे. मोफत औषध वितरण शिबिरे. मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती जागरुकता सत्रे. मोफत एक्स-रे, ईसीजी, सीटीस्कॅन तपासणी, मोफत प्रयोगशाळा, चाचण्या किशोरवयीन मुलीची तपासणी.

  1. महिलांची असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग).
    तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे.
    जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी.
    किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन.
  2. माता आणि बाल आरोग्य सेवा
    गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे.
    हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन.’
    बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण केले जाईल.
    3 रक्तदान शिबीर 1 ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा. रक्तदान दिन असून त्याअनुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान या अभियाना दिवशी राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक सर्व रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभघ्यावा. तसेच My Gov. Portal द्वारे रक्तदान प्रतिज्ञा उपलब्ध करुन देण्यात येईल.
    4 आयुष्यमान वय वंदना कार्ड नोंदणी आणि कार्ड वाटपः आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMIAY) अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्यांना करण्यात येईल.
  3. क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी.
    क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दानशुर व्यक्ती. संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या करिता माय भारत स्वयंसेवक अथवा इतर स्वयंसेवकाच्या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करणे शक्य होईल.

तपासणी शिबीरामध्ये (Screening camp) मध्ये आवश्यक असणा-या रुग्णांना विशेषज्ञा कडून तपासणी साठी संदर्भित केले जाईल व त्यांच्या आवश्यक त्या रक्त लघवीच्या तपासण्या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्यात आले आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आपला सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असून, आपण आपल्या वृत्तपत्र, वाहिनी, बातमीपत्रात व पॉडकास्ट इ. माध्यमा‌द्वारे या महत्वाच्या व्यापक जनहिताच्या अभियानास व्यापक प्रसिध्दी देऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा ही विनंती.

error: Content is protected !!