प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक – गटविकास अधिकारी जंगले यांचे आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे ग्रामपंचायत ही लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत आहे. या पूर्वीसुद्धा अनेक अभियान ग्रामपंचायतीने आपल्या गावात यशस्वीपणे राबविली आहेत. या अभियानातील प्रत्येक उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उंबर्डे ग्रामपंचायतची ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करतांना गटविकास अधिकारी जंगले बोलत होते.

यावेळी सरपंच वैभवी दळवी, उपसरपंच सतीश तुळसणकर, माजी सरपंच एस. एम. बोबडे, पोलीस पाटील विजय दळवी, रत्नाकर बंदरकर, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी गावातील महिला बचत गटाच्या सचिव अध्यक्ष सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक अनिल घुगे यांनी पंचायत राज अभियान शासन निर्णयाचे निकष नियम व अटी यांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. शासकीय निकषाप्रमाणे प्रत्येक घटकावर काम करून हे अभियान यशस्वी करण्याचे सर्व ग्रामस्थांनी मान्य केले.

error: Content is protected !!