अखेर ठेकेदार वरमला आणि हेरिटेज ट्री किरमॅंगो (किर्याचा आंबा) वृक्षाला जीवदान !

फोंडाघाट ग्रामस्थांमध्ये समाधान!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटच्या इतिहासामध्ये वारसदार असलेला हवेलीनगर येथील हेरिटेज वृक्ष कीऱ्याचा आंबा तथा किरमँगो वृक्ष, रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.वृक्षतोड ठेकेदाराच्या प्रत्येक झाडावरील खुणा मुळे जनतेमध्ये हा वृक्ष तोडला जाणार याबद्दल संताप व्यक्त होत होता.त्याच्याच प्रतिक्रिया फोंडाघाट व्हाट्सअप आणि सोशल मीडिया वरून गेल्या दोन दिवसात व्यक्त झाल्या.याचा जाब वृक्षतोड ठेकेदार–मॅनेजर रवी यांना ग्रामस्थांनी विचारल्यावर त्यावर त्यांनी सारवासारव करत उत्तरे देत, त्यांनी तो वृक्ष आमच्या हद्दीत येत नसल्याचे जाहीर केले. आणि किरमँगो वृक्ष तोडणार नसल्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे ग्रामस्थ मध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे. आणि कोणतेही काम करताना किंवा वृक्ष तोडताना आपण संबंधित ग्रामस्थांना विश्वासात घेऊ, असेही ठेकेदाराने आश्वस्त केले…

error: Content is protected !!