कणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथून कणकवली ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ६ वाजता कणकवली येथून रवाना होणार असून दिनांक २४ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी शिर्डी येथे पोहोचणार आहे.

या पदयात्रेत भाविक विविध मार्गांवरून प्रवास करणार असून त्यामध्ये फोंडाघाट, वैभववाडी, कोल्हापूर, कराड, सातारा, लोणंद, मोरगाव, सुपा, न्हावरा, शिरूर, अहमदनगर बायपास या मार्गांचा समावेश आहे. या पवित्र पदयात्रेमध्ये साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आपली नावे दिनांक ५ जानेवारी, २०२६ पर्यंत विशाल कामत – ९४२११४८३३३, राजन परब – ९४२२४३५४४४ या नंबरवर नोंदवणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!