वैभववाडीत मालमत्तेच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : मालमत्तेच्या वादातून नाधवडे दोन सख्ख्या भावांमध्ये मारहानीचा प्रकार घडला आहे. या मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नाधवडे येथे राहणारे रमेश चव्हाण यांचा एक मुलगा एक कुंभवडे येथे तर एक कणकवली तालुक्यातील तरळे येथे राहतो. शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कुंभवडे येथील मुलगा प्रतीक रमेश चव्हाण (38) हा नाधवडे येथे वडिलांच्या सही साठी आला होता. वडील रमेश व प्रतीक चर्चा करीत असता दुसरा पराग याने वडील रमेश यांना फोन केला व पैसे मागीत होता. त्यावेळी तो फोन वर बोलत नाधवडे येथे पोचला. यावेळी प्रतीक व पराग यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पराग याने प्रतीक यांच्या डोकीवर दांडा मारून दुखापत केली. याबाबत प्रतीक याने दिलेल्या तक्रारी वरून पराग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर पराग याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी 10 वाजता नाधवडे येथे राहत असलेल्या वडीलांकडे मालमत्तेची बोलणी करणेसाठी गेलो असता प्रतीक याने शिवीगाळ करून मारहाण केली तसेच नारळाच्या झावळीने मारून दुखापत केली असल्याचे म्हटले आहे. पराग याच्या तक्रारी वरून प्रतीक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!