आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे ना. नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. ०८ फेब्रु. २०२६ रोजी उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ मत्स्य व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र शासन तथा तज्ञ संचालक ना. नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दि. ०८ फेब्रु. २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माननीय आमदार निलेश राणे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे संचालक संदीप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा प्रबंधक नाबार्ड दिपाली माळी, सतीश आंगणे अध्यक्ष – आंगणेवाडी विकास समिती, नितीन काळे – जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार – व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद), जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने आंगणेवाडी व देउळवाडा गावच्या ग्रामस्थांनी तसेच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दि. ०८ फेब्रु. ते दि. १० फेब्रु. २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

error: Content is protected !!