गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर; पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये नोकरीला आहेत त्यांना निवडणुकीसाठी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती. ही मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मान्य केली असून गोव्यात कामासाठी असलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार असलेल्या मतदारांना गोवा राज्याने सुट्टी जाहीर केली आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी उद्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती तसेच इतर अनेक जण गोवा राज्यात नोकरी निमित्त जात असतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भरपगारी रजा देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्र्यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या संदर्भात प्रत्यक्ष होऊन द्वारे मुख्यमंत्री प्रमुख सावंत यांच्याबरोबर अलग मंत्री नितेश राणे यांनी चर्चा सुद्धा केली.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ही सुट्टी मान्य केली आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!