देवघर धरणग्रस्तांचे उपोषण तात्पुरते स्थगित ; 2 मे रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक

आमदार नितेश राणे, माजी सभापती मनोज रावराणे यांनी धरणग्रस्तांची केली पाठराखण

कणकवली (प्रतिनिधी): 32 वर्षे उलटूनही अद्याप देवघर धरण प्रकल्पग्रस्त असलेल्या 55 प्रकल्पग्रस्तांना निवासी भूखंड न दिल्या विरोधात धरणग्रस्तांनी आज महाराष्ट्र दिनी उपोषण छेडले. भूखंड न मिळाल्यास देवघर धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्यानंतर पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी उपोषणकर्त्यांसोबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची 2 मे रोजी बैठक बोलावत या बैठकीत तोडगा काढायचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. धरणग्रस्तांची आमदार नितेश राणे व माजी सभापती मनोज रावराणे यांनी पाठराखण करत त्यांना पाठिंबा देत प्रशासनाला उपोषणाची दखल घेण्यास भाग पाडले. देवघर धरणग्रस्त असलेले एकनाथ परब व अन्य 55 जणांनीरे पुनर्वसन गावठाण निर्माण करून निवासी भूखंड देण्याचे आश्वासन पटबंधारर अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत प्रकल्पग्रस्तांनी घळभरणी ला सहकार्य केले. पण त्यानंतरही भूखंड वाटप केले गेले नाही. या फसवणुकी विरोधात आज महाराष्ट्र दिनी धरणग्रस्तांनी आमरण उपोषण छेडत प्रसंगी देवघर धरणात जलसमाधी चा इशारा दिला होता.अखेर आज जिल्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी आणि पाटबंधारे उपअभियंता मकरे यांनी अनुक्रमे ओरोस आणि देवघर धर आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय आणि देवघर धरण स्थळी आमरण उपोषण छेडले.फोंडाघाट पाटबंधारे कर्मचारी वसाहत मधील रिकाम्या जागेत तिसण येथील उपोषण कर्त्यांशी सकारात्मक चर्चा करत 2 मे रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसोबत धरणग्रस्तांची बैठक निश्चित केली. भूखंड वाटप बाबतचा प्रस्ताव 15 दिवसांत शासनाकडे पाठवण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.उपोषणकर्त्यांमध्ये घोणसरी सरपंच श्री. मॅक्सी पिंटो, दुग्ध संस्थेचे चेअरमन श्री. गणपत परब, श्री. मिलींद मराठे, श्री. नाना परब , श्री. पोर्लेकर, श्री. बाबू सावंत, श्री. बाबू खांडेकर , श्री. गणेश जाधव, श्री. चंद्रकांत जाधव,. एकनाथ परब, विजय रासम,संतोष परब,विश्वनाथ परब, बाळकृष्ण सावंत,अनिल सावंत,संतोष निळेकर,मारुती बांबरकर,विष्णू पेडणेकर हे सामील झाले होते.

error: Content is protected !!