त्रिंबक येथे १५ मे रोजी मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिर….!

जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल येथे शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रूग्णांची तपासणी, निदान, मोफत औषधोपचार आणि चष्मा वाटप करणार आहेत. रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने या वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात
१) नामवंत डॉक्टरांकडून सर्व रूग्णांची तपासणी, निदान व औषधोपचार
२) रक्तदाब व रक्तातील साखर तपासून व मधूमेह
३) मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप
४) मोफत औषधांचे वाटप
५) गर्भाशय कर्करोगाच्या ( cervical cancer) निदानासाठी स्त्रियांची महिला डॉक्टरांनकडून तपासणी
६) संधीवात आणि मणक्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध
७) बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून बाल रूग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत तरी त्रिंबक गाव आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रूग्णांनानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. सिध्देश सकपाळ, ग्रामपंचायत त्रिंबक, जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई, रॉयल मालवणी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!