ग्रामपंचायत पडेल च्या सदस्य पदावरती सायली वारीक विजयी

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमध्ये ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या एका जागेवर सायली अजय वारीक (187 मते) विजयी झाल्या. येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य सायली वारीक यांचे अभिनंदन केले.

पडेलमधील सर्वसाधारण स्त्री जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. यासाठी गुरूवारी (ता.18) मतदान घेतले गेले होते. 29.24 टक्के इतके मतदान झाले होते. एकूण 718 मतदारांपैकी 210 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अक्षता सतीश तानवडे (22 मते) आणि सायली अजय वारीक (187 मते, विजयी) असे दोन उमेदवार रिंगणात होते. एक मत नोटाला मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिगंबर खराडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!