अर्धा पाऊण तास चाललेल्या पावसानंतर पुन्हा सुर्यनारायणानांची हजेरी कायम
वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याचे दिसून येत होते. आज दुपारच्या नंतर साधारण वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले आणि सायंकाळी 3.30 च्या सुमारास वैभववाडी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सलग अर्धा पावून तास चाललेल्या या वादळी वाऱ्यासह पावसाने साऱ्यांचीच धांदल उडाली हे जरी खरे असले तरी या पावसाने अनेक जीव सुखावले देखील. वाढलेल्या उष्णतेमुळे अनेकजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांना थोडासा दिलासा मिळाला. परंतु पुन्हा 4.30 च्या सुमारास सुर्यनारायणानी आपले प्रखर रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. परीणामी वातावरणातील गारवा फार काळ टिकुन राहणार नाही हे खरं.












