आचरा ज्यू. कॉलेजच्या २००२ बॅचच्या विध्यार्थ्यांकडून सन्मान
आचरा (प्रतिनिधी) : आचरा हायस्कूल व ज्यूनिअर काँलेजचे शिक्षक बस्त्याव फ्रान्सिस फर्नांडीस हे गेल्या महिन्यात निवृत्त झाले होतो. चोविस वर्ष मराठी आणि इग्रजी विषयाचे विद्यादान करत त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. यातील अनेक जन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. 2002 च्या बारावी कला शाखेचे सर्व विद्यार्थी उत्तिर्ण होत. आचरा काँलजचा निकाल त्यावेळी 100% लागला होता. याच काही विद्यार्थी एकत्र येत बस्त्याव फर्नांडिस यांचा काल, शाल, श्रीफळ, आणि भेट वस्तू देवून सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना फर्नांडिस गुरुजी म्हणाले की शिक्षण देण हे माझ काम होत. आपण सत्कार केलात या बद्दल मी आनंदी आहे. सिधुंदुर्ग जिल्ह्यातील त्यावेळी ज्या दोन शांळानी 100% निकाल दिला होता त्यात तुमचा समावेश होता याचा अभिमान वाटतो. आपण सर्व विविध क्षेत्रात काम करता आहात हे पाहून मी समाधानी आहे तसेच तुम्ही कधीही हाक दिलात तर मी मार्गदर्शनासाठी तुमच्या सदैव तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी अजय कोयंडे, मुकेश सावंत, देविदास सावंत, गणेश मयेकर, निलेश सावंत, एकनाथ साटम, सुदर्शन गांवकर, चंद्रकांत गोलकर, विवेक परब आदी उपस्थित होते.











