मनसे सरचिटणीस उपरकर यांचा आरोप
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तहसीलदार कचेरीलगत पोलीस ठाणे आहे. जुन्या कचेरीच्या आवारात वेंगुर्ले तालुक्यातील जमिनी बाबतचे फेरफार, दस्तऐवज, टेम्पो भरून घेऊन गेले.1956 सालापासून चे महसूल दस्तऐवज गायब झालेत अशी माहिती वेंगुर्ले तहसीलदार ओतारी यांनी दिली आहे. त्यातील काही कागदपत्रे महसूल यंत्रणेला प्राप्त झाल्याची माहिती वेंगुर्ले तहसीलदार यांनी दिली. ही कागदपत्रे गायब होण्यात काळेबेरे आहे असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. वेंगुर्ले समुद्रकिनाऱ्यालगत अनेक राजकीय व्यक्तींनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यात काही बोगस नावाने खरेदीखत झालेली आहेत.त्यामुळे 1956 साल पासून चे महसूल दस्तऐवज गायब झालेत तरीही राजकीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी याची दखल घेत नाहीत. यामागील सुत्रधाराला अटक केली जात नाही आहे. त्यामुळे याला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे दिसून येते. सावंतवाडी तहसील कचेरीत अशाच प्रकारे प्रकरण घडल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांची बदली करून चौकशी करण्यात आली होती.दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनी परप्रांतीयना विकल्या गेल्यात. त्यातून परप्रांतीय स्थानिकांना त्रास देत आहेत.माझ्या आमदारकीच्या काळात अशी बोगस 15 हुन अधिक खरेदीखते मी रद्द करवून घेतली होती. वेंगुर्लेत तहसीलदार कार्यालयातील 1956 सालपासून गायब झालेली कागदपत्रे हस्तगत करण्यासाठी गुजरात केरळ कोईम्बतुर पर्यंत जावे लागले आहे.शेतकरी आणि जनतेची महत्वाची महसूल कागदपत्रे जर महसूल यंत्रणा सुरक्षित ठेवत नसेल तर सामान्य जनतेने करायचे काय ? असा सवाल मनसे सरचिटणीस उपरकर यांनी केला.












