कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ शहरात ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी कुडाळ शहरात प्रामुख्याने बुधवार आणि रविवार याच दिवशी ट्राफिकची समस्या जाणवत होती. परंतु, आता अन्य दिवशीही ट्रॅफिकची समस्या होत आहे. कुडाळ पोस्टनजिक मोठी वाहतूक कोंडी होत असून याबाबत अनेकदा पोलीस प्रशासनाने सुद्धा बेजबाबदार वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. परंतु, अजूनही कुडाळ शहरात ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कुडाळ पोस्टनजीक मालवण रोडवरच एक कठडा असून तो या वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा कठडा लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुडाळ शहरात सातत्याने जाणवतेय ट्रॅफिक जाम ची समस्या












