देवगड (प्रतिनिधी) : देवगड निपाणी रस्त्यावर देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या साईटच्या बाजूची साईट पटटी बरेच महिने खराब अवस्थेत असल्याने याचा खालची बाजारपेठ व विठठलवाडी तसेच किल्ला येथील नागरिकांना तसेच येणा-या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे देवगड बीचवर व किल्ला पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या खराब साईड पटटीमुळे अपघात होत होते. याची दखल घेवून उपनगराध्यक्षा मिताली सावंत व मंडळाचे अध्यक्ष विजय कदम व उपाध्यक्ष आनंद देवगडकर तसेच पंचशिलनगर मधील नागरिक यांनी या रस्त्याच्या साईट पटटी दुरुस्ती संदर्भात 1 नोव्हेंबर 2022 रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड यांना निवेदन देवून साईट पटटी दुरुस्ती संदर्भात निवेदन देवूनही या साईट पटटी विषयक संबंधित विभागाने दखल घेतलेली नाही. या संदर्भात् आमदार नितेश राणे देवगड शहराच्या दौ-यावरती आले असता सदर गोष्टीची आमदार नितेश राणे यांना सदर विषयाची कल्पना दिली असता आमदार नितेश राणे यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना या विषयांची सुचना केल्यामुळे याचा परिणाम सदर रस्त्याच्या साईड पटटीचे मटेरियल येवून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झाली आहे. तसेच पुढील आठ दिवसांमध्ये काम पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन देखील सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांनी आपणास दिले असल्याचे मत प्रसिध्दीपत्रकाव्दारे उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आमदार नितेश राणे यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.
आ.नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या कामाला गती












