नैसर्गिक आपत्तीचा सजगतेने सामना करावा – निळकंठ बगळे

देवगड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न ; पोलीस पाटील सागर सुरक्षा वार्डन, सागरी सुरक्षा रक्षक दल सदस्यांना करण्यात आले मार्गदर्शन

देवगड (प्रतिनिधी): पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती चा सामना करण्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. वादळी वारा, पाऊस असताना जीवित अथवा वित्तहानी होणार नाही यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.आपत्कालीन स्थितीत सजग राहावे असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले. देवगड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील, सागरी सुरक्षा रक्षक दलाचे सदस्य, सागर सुरक्षा वार्डन, यांची बैठक जुलै रोजी देवगड पोलीस ठाण्यात सकाळच्या सत्रात घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांना आगामी सण- उत्सव तसेच वादळी वारा पाऊस ,आपत्ती व्यवस्थापन बाबत घ्यावयाची दक्षता व खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी श्री. जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. यावेळी उपनिरीक्षक दशरथ जाधव, तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!