(ब्युरो न्युज) : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीय. फॉरेन्सिक एक्सपर्टसना सोबत घेऊन नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आलाय…यामुळे सर्व मृतकांचे नातेवाईक बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचलेयत. या अपघातात कुणी मुलगा गमावलाय तर कुणी मुलगी…कुणाची आई गेलीय तर कुणाचे बाबा…भयानक घडलेल्या या अपघातात 25 जणांना जीव गमवावा लागलाय.