वरिष्ठ वायरमन ईश्वर मोहितेची बदली रद्द करावी

कलमठ ग्रामस्थांनी महावितरण कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

आमदार नितेश राणेंनी बदली रद्द करण्याची कार्य.अभियंत्यांना केली सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ परिसरासाठी मागील 4 वर्षे कार्यरत असलेले वरिष्ठ वायरमन ईश्वर मोहिते यांची ऐन पावसाळ्यात केलेली बदली रद्द करावी अशी मागणी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा पं सदस्य तसेच कलमठवासीयांनी महावितरण चे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली. तसेच आमदार नितेश राणेंचेही याकडे लक्ष वेधले असता आमदार नितेश यांनी सदर बदली रद्द करण्याची सूचना कार्यकारी अभियंत्याना केली आहे. वरिष्ठ वायरमन मोहिते हे मागील 4 वर्षे कलमठ च्या नागरी वस्त्यांमध्ये प्रामाणिकपणे सेवा देत आहेत.कलमठ गावच्या वाढत्या शहरीकरणामुळे विजवीतरण च्या समस्या उदभवू शकतात. त्यातच मोहीतेंसारख्या अनुभवी वायरमनची बदली झाल्यास त्याचा फटका कलमठ गावाला बसू शकतो.त्यामुळे मोहिते यांची बदली रद्द करावी अशी मागणी कलमठ वासियांनी केली आहे.

error: Content is protected !!