आचरा (प्रतिनिधी): काल संध्याकाळी आचरा गावा मध्ये महिलेच्या अंगावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये आचरा हद्दीतील रहिवासी मंदार सरजोशी, विक्रांत आचरेकर, मंदार बिनसाले, रिक्षा चालक रणजीत पांगे तसेच पोलीस अंमलदार अक्षय धेंडे, पोलिस चालक मनोज पुजारी यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचे प्राण वाचवण्यासाठी टीम वर्क केले होते. यासर्वांच्या तत्परतेची दखल घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सर्वाना आचरा पोलिस ठाणे येथे बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे आभार मानण्यात मानले.
आचरेतील त्या महिलेस जीवदान देणाऱ्या सर्वांचा आचरा पोलिसांकडून सन्मान…!












