प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अबिद नाईक यांना रीतसर निवडीचे लेखी पत्र दिले आहे.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडीनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पक्षांतर्गत घडामोडी सुरू झाल्या असून सिंधुदुर्गात ही दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे समर्थक असलेल्या अबिद नाईक यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी तसे पत्र अबिद नाईक यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अनावकरगुरूजी,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर,माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,केदार खोत, प्रवीण मोर्ये आदि उपस्थित होते.












