मराठा समाज विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली व जे विद्यार्थी/विद्यार्थीनी, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, विरार, पनवेल येथे स्थायिक असतील, व एम.एस.सी.(आय, टी.)/(कॉम्प्युटर), सी.ए. तसेच मेडिकल, इंजिनिअरीग, अग्रीकॅल्चर, फार्मसी, कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा गरजू व हुशार मुलांना परत फेडीच्या अटीवर, शिष्यवृत्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी गरजू विद्यार्थ्या कडून संस्थेच्या छापील फॉर्मवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यानी छापील फॉर्मसाठी स्वत:चे नाव व पत्ता लिहिलेले व त्यावर पाच रुपये पोस्ट तिकीट लावलेले पाकीट व आपली पूर्ण माहिती – सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, स्टार मॉल, ३रा मजला, न चि केळकर मार्ग, शिवाजी मंदिर शेजारी , दादर-( पश्चिम) मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावे, अथवा (सोमवार वगळून) दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यालयातुन घेऊन जावे. अधिक माहिती साठी नरेंद्र सावंत – ९९८७६८६५३२, बाळ पंडित-९८६७७९७४४८,
बाळ पाताडे- ९८३३९४६९६१ यांच्याशी संपर्क साधावा. असे संस्थेचे सरचिटणीस – प्रभाकर परब यांनी आवाहन केले आहे.

error: Content is protected !!