आचरा (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्तव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला असून त्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या सात व्यक्तींना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले असून या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्यपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले – मातोंड ( गोवळवाडी ) येथील दिपक भगत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
दिपक भगत हे स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन अधिकारी पदावरून निवृत्त झालेले असुन, पहिल्यापासून अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदु परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणुन काम केलेले आहे. सन १९८७ ते १९९२ या कालावधीत अभाविप ची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. सातत्याने गो – सेवा या क्षेत्रात कार्यरत असलेले दिपक भगत यांचा नैसर्गिक शेतीवर भर असून नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देतात. तसेच त्यांचा स्वताचा फळ प्रक्रिया उद्योग व कलम नर्सरी उद्योग आहे.
अशा प्रकारे गो-सेवा प्रकल्पाशी निगडित असलेले दिपक भगत यांची महाराष्ट्र राज्याच्या “महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या” राज्यस्तरीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा परिवाराकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील दिपक भगत यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यस्तरीय सदस्य पदी निवड












