खारेपाटण (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत व खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या सेंक विद्यमाने खारेपाटण येथे प्रथमच पावसाळी रबर बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.१५ व १६ जुलै २०२३ रोजी करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण विभाग शिवसेना युवा सेना प्रमुख तेजस राऊत यांनी दिली. खारेपाटण येथील शेठ न.म.हायस्कूलच्या भव्य मैदानवर खेळविण्यात येणाऱ्या ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा फक्त खारेपाटण गाव वाडी मर्यादित असून खारेपाटण गावातील फक्त १६ संघाना यामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.तसेच या स्पर्धेतील संघाना कोणत्याही प्रकारची प्रवेश फी ठेवण्यात आली नसून आयोजकांच्या वतीने ही स्पर्धा विनाशुल्क ठेवण्यात आली आहे. तर या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला रोख ७००० /- रुपये व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख ५००० /- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी ज्या संघाना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे.त्यांनी तेजस राऊत – ८२०८०५८१२३ व समीर गुरव – ९३२५९१४९३१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना शाखा खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.
खारेपाटण येथे १५ व १६ जुलै रोजी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन












