आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेची दैनावस्था – सुशांत नाईक
वैभववाडी (प्रतिनिधी): युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णाल्यानंतर आज वैभववाडी ग्रामीण रुग्णालय व उंबर्डे आरोग्य केंद्र येथे भेट दिली.वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येचा आढावा घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचत रुग्णालयात असलेल्या समस्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. नाईक यांनी आढावा घेत असताना कर्मचाऱ्यांनी, रुग्णालयात शौचालयांना कड्या नाहीत, कफ सिरप उपलब्ध नाही, पगार वेळेवर होत नाही,रक्त तपासणीची अद्यावत मशनरी आहे परंतू आर्थिंग व्यवस्था नसल्याने ती मशीन धूळ खात आहे. कर्मचारी वर्गाच्या रिक्त जागा भरल्या नाहीत. अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. याबाबत आपण आवाज उठवू असं नाईक यांनी सांगितले. तसेच या समस्यांबाबत आमदार नितेश राणेंवर देखील जोरदार आरोप करण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी राज्यात बोंब मारत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील जनतेच्या समस्यांवर लक्ष द्यावे असा टोला नाईक यांनी लगावला. तसेच वैभववाडी ग्रामीण आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा याकरिता देखील त्यांनी मागणी केली. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, सरपंच विलास नावळे, जितेंद्र तळेकर, सुनिल कांबळे, मनोज सुनील रोहीत पावसकर, अतुल सरवटे, गणेश पवार, नितेश शेलार, यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.












