वाढदिवशी संदेश पारकर झाले भावुक
कणकवली (प्रतिनिधी): समाजाचे आपण देने लागतो या भावनेने सामाजिक उपक्रम आयोजित करतो. वाढदिवसानिमित्त आधी आठ दिवस सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे. माझा राजकीय प्रवास सुरु असला तरी जनतेशी असलेली नाळ मी कायम जोडून ठेवली आहे. मला कुठलेही पद नसल्याने माझ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकलो नाही. त्या कार्यकर्त्याला विश्वस देत उभे करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्यात परिवर्तन आवश्यक आहे.तरच जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. महाविकास आघडी काळात शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास झाला.शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ अशी महत्वाची कामे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत.संधी मिळाली तर नक्कीच सोने करेन अशा शब्दांत संदेश पारकर यांनी वाढीवस अभिष्टचिंतन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले.











