कणकवली (प्रतिनिधी): जीजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने हरकुळ उर्दू हायस्कूल,व म.गो.सामंत विद्यालय येथे मोफत वहया वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत चांगल्या मार्क्सने आलेल्या विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्याकडून आय वॉच देण्यात आली. त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,माजी सभापती बाबा वर्देकर, बुलंद पटेल, राजू पेडणेकर,माजी उपसरपंच परब मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
जीजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वहया वाटप











