मोरजेच्या नितेश ला डोके फुटेस्तोवर मारहाण
कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील जुगारी मोरजेच्या नितेश वर गोवा तोरसे येथे जुगार खेळतानाच्या आर्थिक वादातून गंभीर हल्ला झाला असून डोके फुटेस्तोवर मारहाण झाली आहे. कणकवलीत चोरीछुपे अंदर बाहर पट मांडणाऱ्या या जुगारी ने दाजीपूर, हातीवले आदी ठिकाणी जिल्ह्याबाहेर पट मांडला होता.मात्र याची पोलखोल झाल्यानंतर त्याने आपला मोर्चा आपल्या सहकाऱ्यांसह पत्रादेवी चेकपोस्ट च्या पुढे तोरसे येथे वळवला. सिंधुदुर्गातील बहुतांश जुगारी तोरसे येथेच जाऊन सध्या जुगार खेळतात. काल 13 जुलै रोजी रात्री जुगार खेळताना झालेल्या आर्थिक वादावादी नंतर अड्डा मालकाने च मोरजेच्या नितेशवर हल्ला करत डोके फुटेस्तोवर मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी झालेल्या मोरजेच्या नितेशवर बांदा येथे वैद्यकीय उपचार करत मलमपट्टी करण्यात आली.











