पावशी-कुडाळ येथे 15 जुलै रोजी सिंधुभार्गव मित्र मंडळ आयोजित महा रक्तदान शिबिर

कुडाळ (प्रतिनिधी): रक्तदान पुण्यदान या उक्ती प्रमाणे सिंधुभार्गव मित्रमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार दि.15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीराला येणाऱ्यांनी समीर रुणकर-9673130095, अँड.विवेक गोखले-9404906693, विघ्नेश गोखले-8208430500, मंदार सरजोशी-9404931990 यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यदान करावे असे आवाहन सिंधुभार्गव मित्रमंडळच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!