एकूण पाच विद्यार्थी झळकले जिल्हा गुणवत्ता यादीत
खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या इयत्ता पाचवीतील एकूण पाच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शिष्यवृत्ती पटकावली असून, कुमार रुद्र राजू गर्जे या विद्यार्थ्याने २७८ गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक पटकावला. कुमार रेवन अनंत राऊळ याने २६२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकावला.तर कुमारी संस्कृती संगाप्पा गुरव हिने २४२ गुण मिळवून जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला. व कुमार अर्णव प्रवीण कासार याने २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक पटकावला आहे. तसेच कुमार अभिनव लक्ष्मीकांत हरयाण याने २२८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सेक्रेटरी श्री महेश कोळसुलकर, सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर व परिसरातील पालक व हितचिंतक यांच्याकडून करण्यात येत आहे.











