ग्रामीण विभाग गटात मालवण तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात सातवा
चौके ( अमोल गोसावी ) : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये नवनीत सोमनाथ परब या विद्यार्थ्याने ग्रामीण विभाग गटातून मालवण तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात सातवा क्रमांक पटकवला आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नवनीत याला शिक्षक व पालक यांचं मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर , ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे खजिनदार रवींद्रनाथ पावसकर व सर्व सन्माननीय संचालक वराडकर हायस्कूल कमिटी चे चेअरमन सुधीर वराडकर या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











