बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मधून इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2023 च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वी चे 16 तर इयत्ता 8वी चे 15 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी इयत्ता 5वी 8 विद्यार्थी व इयत्ता 8वी चे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र आहेत.

या विद्यार्थ्यांमधून इयत्ता 5वी च्या कुमारी ओवी अमर अकनूरकर इयत्ता सहावी हिला 72 टक्के प्राप्त झाले आहेत व जिल्ह्यात 41 वा क्रमांक प्राप्त झाला आहे इयत्ता 8वी मधून कुमार तनिष्क रामदास कापसे इयत्ता नववी हा 59.064 गुण मिळवून जिल्ह्यात 37 वा आला आहे. कुमारी तनिष्का संदीप सावंत इयत्ता नववी हिला 56.3758 गुण मिळाले असून जिल्ह्यात 58 नवी आली आहे. कुमारी रितिका लवेश खापेकर इयत्ता नववी हिला 56.3758 गुण मिळालेले असून जिल्ह्यात 59वी आली आहे. 

संस्थेच्या वतीने सचिव .सुलेखा राणे  खजिनदार  रमेश राणे, संचालक,संदीप सावंत,अभिजीत सावंत , संस्था सदस्य. विनायक सापळे, उत्कृष्टता समन्वयक . प्रणाली सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका .सौ कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!