फेसबुक साईट वरून कपडे खरेदी पडली महागात; ३२ हजार रुपयांची फसवणूक

देवगड (प्रतिनिधी) : ऑनलाईन ड्रेस मागविताना जामसंडे विष्णुनगर येथील आद्या अमेय गुमास्ते यांची ३२,१३५ रूपये अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून काढून घेवून फसवणूक केल्याचा प्रकार शनिवार १५ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत झाला.याप्रकरणी आद्या गुमास्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जामसंडे विष्णुनगर येथील आद्या गुमास्ते यांनी दि ४ जुलै रोजी फेसबुक साईटवरून ऑनलाईन ड्रेस मागविला होता.मात्र १२ जुलै रोजी आलेल्या पार्सलमध्ये ड्रेस ऐवजी फॉल लावलेली साडी आली.त्याने पसंत नसल्याने ते पार्सल परत पाठविले व कॅश ऑन डिलीव्हरीनुसार दिलेले ७९९ रूपये रिफंड करण्यासाठी एस्एम्एस् केला यावेळी त्यांना एक फॉर्म भरण्यास सांगीतले. फॉर्म भरल्यानंतर व पैसे रिफंड करण्यासाठी एस्एम्एस् केल्यानंतर त्यांनी शनिवारी पैसे रिफंड झाले का याबाबत चेक केले असता पैसे रिफंड न होता ३२,१३५ रूपये रक्कम अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून काढून घेतले व फसवणुक केल्याचे त्यांचे निदर्शनास आले.त्यांनी याबाबत देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात भादवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.

error: Content is protected !!