देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील फणसगाव हायस्कूल येथे विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी प्रशालेतील मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा करून सांगितला मोबाईल मुळे सायबर क्राईमचा धोका भरपूर वाढला आहे तसेच सध्याची तरुण मुले-मुली मोबाईलचा गैरवापर करताना दिसत आहेत परिणामी याचा परिणाम घरातील पालकांना होत आहे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ,पब्जी गेम याच्या अतिवापरामुळे विद्यार्थी भावनेच्या आहारी जाताना दिसत आहेत म्हणून लैंगिक गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे अशा जीवघेण्या गोष्टीतून आपल्याला वाचायचे असेल तर विद्यार्थी व पालकांनी काही गोष्टी करणे आवश्यक आहेत.त्यात पालकांनी मुलांना वेळ देणे, कुटुंबासोबत जेवणे, आपल्या पाल्याबरोबर गप्पागोष्टी करणे, मोबाईल गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळांचे महत्त्व समजावून सांगणे व त्यांना आवड निर्माण करणे असे सांगितले.यावेळी ए.बी गुनिजन यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोक्सो कायद्या विषयी मुलांना माहिती दिली या कायद्याच्या तरतुदी त्याचे स्वरूप व त्याची अंमलबजावणी व त्याचे गंभीर परिणाम याविषयी मुलांना माहिती देण्यात आली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अरुंधती गोखले मॅडम, अनिल राणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले आभार प्रदर्शन गावकर सर यांनी केले. इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय फणसगाव येथे मोबाईलचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन











