सिंधुदुर्गातील अनुभवाची शिदोरी भविष्यात उपयोगी – सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांना पत्रकारांनी दिला निरोप

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय काम करताना समाधान मिळाले. जिल्ह्यातील पत्रकार, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक अशा अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण करता आले. या जिल्ह्यात मला भरपूर शिकता आले, एक चांगला अनुभव या जिल्ह्यात घेता आला. सिंधुदुर्गातील अनुभवाची शिदोरी घेऊन मी पुढची वाटचाल करीत आहे, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी या पदाचा कार्यभार सोडताना काढले.

जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा पत्रकार संघ, व मुख्यालय पत्रकार संघ यांच्या वतीने प्रशांत सातपुते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सातपुते यांची रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार आज सोडला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, विनोद दळवी आदी पत्रकारांसह जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी संदीप राठोड, रवींद्र देवरे, अमित राणे, नरेंद्र खोबरेकर, महेंद्र भालेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी, जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!